नऊ वर्षानंतर बोपखेलवासीयांना दिलासा, बोपखेल आणि खडकीला जोडणारा पूल पूर्ण

0
slider_4552

पुणे :

बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलाचे लवकरच लोकापर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नऊ वर्षानंतर बोपखेलवासीयांना दिलासा मिळणार आहे.

बोपखेल गावासाठी दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (सीएमई) हद्दीतून जाणारा नागरी रस्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला होता. त्यामुळे बोपखेल गावातील रहिवाशांना दापोडीकडे जाण्याकरीता पूर्वी लागणारे दोन किलोमीटरचे अंतर रस्ता बंद झाल्यामुळे सुमारे 16 किलोमीटर झाले. त्यामुळे बोपखेल येथील नागरीकांना पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करण्यासाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी, खडकी मार्गावरुन सुमारे 15 ते 16 किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांसह, विद्यार्थी व कामगारांची मोठी गैरसोय होत होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर 1856 मीटर अंतराचा पुल बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. पूल व जोडरस्त्याचे काम टी ॲण्ड टी इन्फ्रा कंपनीने केले. चार वर्षांनंतर पुलाचे काम पूर्ण झाले आहे. छोटी कामे शिल्लक असून लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर पूल वाहतुकीस खुला केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

See also  पदवी समारंभ म्हणजे शिक्षणाचा शेवट नाही – रामनाथ कोविंद