सुस रोड साई चौक येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिन निमित्त पुरोहितांचा सन्मान… 

0

पाषाण :

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिननिमित्त पाषाण येथील साई चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पारपडला. पाषाण पंचकृषीचे पुरोहित प्रभाकर ढेरे गुरुजी यांचा शुभःस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर किशोर खडके गुरुजी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

पुरातन काळापासून पुरोहित मंदिरांमध्ये व घरोघरी जाऊन धर्म सेवा व धर्म जागरणाचे काम करत आहे. पारतंत्र्याचा काळात ही पुरोहित देशभीमान जागृत ठेवण्याचे कार्य करत होते. आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमा निमित्त पाषाण परिसरातील पुरोहितांचा राहुल कोकटे व भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांनी सन्मान केला त्या बद्दल धन्यवाद व्यक्त केले.

श्रीपाद कुलकर्णी, सुमित ढेरे, आप्पा कुलकर्णी, महेश सहस्रबुद्धे, मधुकर भाट, श्रीपाद कुलकर्णी, शिवकुमार पांडे आदि गुरुजींचा सन्मान करण्यात आला. तर विनोद पेंढारकर, रत्नाकर माणकर, हरिभाऊ कोकाटे, शीव पांडे यांनी सर्वांना सन्मानित केले. मयुरी कोकाटे व राहुल कोकाटे यांनी सर्वांचे आभार मानले तर गिरीश चोक व किशोरजी मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

See also  पै. शिवराज बालवडकरने उंचावले बालेवाडीकरांचे नाव, रशियातील स्पर्धेतील यशाबद्दल गावाने केला सन्मान..