बाणेर :
बाणेर येथे धनकुडे नगर पॅन कार्ड रोड येथे शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, नगरसेवक महापालिका शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख राजेंद्र धनकुडे, डॉ. दिलीप मुरकुटे, सुशील लोणकर, ऋतिक धनकुडे नकुल गोळे, संजय निम्हण, अमित रणपिसे, संतोष तोंडे आदी उपस्थित होते.
कोथरूड विधानसभा विभाग प्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या माध्यमातून बाणेर येथे शेतकरी आठवडे बाजाराची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी संजय निम्हण, अमित रणपिसे, यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत घरवापसी केली तर संतोष तोंडे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.
या कार्यक्रमास बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातील शिवसैनिक व महा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.