औंध :
पनामा पवनचक्की कंपनी व महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण महाउर्जा पुणे यांच्या गैरकारभारा विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर हे पुणे औंध येथील स्पाईसर रस्त्यावरील मेढा कार्यालय बाहेर आमरण उपोषणास बसले आहेत.
पनामा पवनचक्की कंपनीने पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी सावळा गोंधळ घातलेला आहे. कंपनीच्या अनेक त्रुटी असताना कंपनी दुसर्या कंपनीला हस्तांतरित केली. शेतकऱ्यां वरती अन्याय करुन दबावतंत्र आणि प्रशासनाची फसवणूक करत दांडगाई ने आपला कारभार चालवला आहे. शासनाची घोर फसवणूक करणाऱ्या कंपनी ला सोईनुसार पाठीशी घालणारे महाउर्जाचे अधिकारी यांच्या विरोधात उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे.
याअगोदर ही याच ठिकाणी उपोषण करण्यात आले होते. तदनंतर अधिकारी आणि कंपनी यांच्या मध्ये तीळमात्र फरक न पडल्याने आज पुन्हा एकदा याठिकाणी उपोषण सुरु करण्यात आले आहे.या उपोषणास पाटण तालुक्यातील मनसे पदाधिकारी व शेतकरी व पुण्यातील स्थानिक शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे,अमर अढाळगे, सिध्दांत अडसुळे,अमित गोणेकर, व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित आहेत.