पुणे :
जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (दि.8) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महिला प्रवाशांसाठी एकूण 17 मार्गांवर धावणाऱ्या 17 बसेस मधून मोफत प्रवास करता येणार आहे.
खालील बस मार्गांवर सदरची सुविधा देण्यात आलेली आहे.
बस क्रमांक – बस मार्ग
301 – स्वारगेट ते हडपसर
117 – स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर
168 – शनिवारवाडा ते केशवनगर मुंढवा
94 – कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन
82 – एनडीए गेट क्र.10 ते मनपा
24 – कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (Women’s Day)
103 – कात्रज ते कोथरूड डेपो
64 – हडपसर ते वारजे माळवाडी
111 – भेकराई नगर ते मनपा
167 – हडपसर ते वाघोली
13 – अप्पर डेपो ते शिवाजीनगर
11 -मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव
170 – पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द
322 – आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा
372 – निगडी ते मेगा पोलीस हिंजवडी
367 – भोसरी ते निगडी
355 – चिखली ते डांगे चौक
जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या महिला स्पेशल बससेवेचा लाभ जास्तीत जास्त महिला प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.