अनेक दिग्गजांच्या उपस्थित बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण.

0

मुंबई :

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती साजरी होत आहे. आज बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती निमित्त  कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपिठावर उपस्थित होते.

राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे.

हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

See also  बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला आघाडी दिल्यास गाव जेवण देणार : चंद्रकांत पाटील