पिंपरी :
दीड किलोमीटर लांबीच्स पदपथ (फुटपाथ) बांधण्याचा, तसे इतर कामांसाठीचा खर्च किती असु शकतो? फार तर १० लाख. पण रावेत येथील भोडवे बाग ते आदर्शनगर चौक रस्त्यावरील बांधण्यासाठी महापालिकेने चौदा ते पंधरा कोटी खर्च केला. विशेष म्हणजे भूसंपादन होऊन रस्ताही तयार झाला आहे, त्या रस्याला जोडून फुटपाथ तयार करायचा आहे. मात्र, त्यासाठी १५ कोटीचा खर्च येणार असल्याचे अधिकार्यांनी तक़ारीला उत्तर देताना नमूद केले आहे.
विकास आराखड्यात नियोजित असलेला हा आधी कच्चा रस्ता होता. त्यावर डांबरीकरण करून पक्का रस्ता तयार करण्यात आला, मात्र, फुटपाथ बनविण्यात आले नाहीत. त्यामुळे रावेत येथील रहिवासी अमोल कालेकर यांनी याबाबत ‘सारथी’ॲपवर तक़ार केली. रस्त्यासोबतचफुटपाथ तयार करण्यात यावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते, त्यांच्या तक्रारिला उत्तर देत महापालिकेने या फुटपाथसाठी १५ कोटीचा खर्च सांगितला.
तक्रार केली बंद
फुटपाथ बनविण्यासाठी महानगरपालिकेने अमोल कालेकर यांना १५ कोटीचा खर्च सांगून त्यांची तक्रार बंद केली. त्यामुळे फुटपाथ होणार की नाही, असा प्रश्न नागरिकाना पड़ला असून ,फुटपाथ नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका असून, मोठे हाल होत आहेत.
महापालिकेने दिलेले उत्तर …
या रस्त्यांच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू आहे. हे रस्ते १८ मीटर व १५ मीटर असून त्यांचा अंदाजपत्रकांमध्ध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. तथापि, या रस्त्याचा फुटपाथ विकसित करण्यासाठी १० ते १५ कोटी तरतुदीची आवश्यकता आहे. त्यास पुरेशी तरतुद उपलब्ध झाल्यास काम करण्यात येईल, असे महापालिकेने उत्तरात म्हटले आहे.
भोडवे बाग ते आदर्शनगर चौक या रस्त्यांवर फुटपाथ बाधण्याकरिता सारथी वर तक्रार करण्यात आली होती. या दीड किलोमीटरच्या फुटपाथला ११ कोटीचा खर्च सांगण्यात आला आहे. जागा संपादित आहे. रस्ता तयार आहे. त्यावर फक्त् फुटपाथ बनवायचा आहे. त्यासाठी एवढा खर्च कसा येऊ शकतो? – अमोल कालेकर, तक्रारदार