पुणे महापालिकेतर्फे अनधिकृत बांधकामावर कारवाई

0
slider_4552

पुणे :

पुणे महानगरपालिका झोन क्र.2 मधील मौजे आंबेगाव बु. (जुनी हद्द) स.नं.43 व स.नं.25 आणि व आंबेगाव स.नं.10 येथील विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सुमारे 47,664 चौ.फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

आंबेगाव बु. (जुनी हद्द) स.नं. 43 व स.नं. 25 येथे 25 महाराष्ट्र महापालिका कलम 478 (1), 260 (अे) (अे) (बी) व कलम 53 (1) (अे) अन्वये नोटीस देऊन विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये आंबेगाव बु. (जुनी हद्द) मधील रोहन ओदेल व इतर यांचे 300 चौ. फुट, एस.एम.पवार व इतर यांचे 900 चौ. फुट, उदित सिंग व इतर यांचे 500 चौ. फुट, तारू राजेंद्र गणपत यांचे 684 चौ., विलास कोकरे व इतर यांचे 150 चौ. विकास चव्हाणव इतर यांचे 80 चौ. फुट आणि आंबेगाव (बु.) स.नं.10 येथील अथर्व डेव्ह. व इतर यांचे 4350 चौ. फुट, साई गणेश डेव्ह. व इतर यांचे 4300 चौ. फुट, श्रावणी डेव्ह. व इतर यांचे 4200 चौ. फुट, आर एल चोरगे व इतर यांचे 4250 चौ. फुट, श्री डेव्ह. व इतर यांचे 4200 चौ. फुट, साईनाथ डेव्ह. व इतर यांचे 4350चौ. फुट, समर्थ डेव्ह. व इतर यांचे 4450चौ. फुट, गवळी व इतर यांचे 4500 चौ. फुट, मौर्य डेव्ह. व इतर यांचे 8300 चौ. फुट, गुरुदत्त डेव्ह. यांचे 2150 चौ. फुट, असे एकूण 47664 चौ. फुट. क्षेत्र मोकळे करण्यात आले.

ही कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर,जॉ क्रशर,ब्रेकर, इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.

See also  पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्याला खंडणीविरोधी पथकाने औंध येथे रंगेहात पकडले.