शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी थर्ड रेल प्रणाली

0
slider_4552

पुणे :

शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गावर पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून पीपीपी तत्वावर खासगी कंपनीकडून मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावरील मेट्रो अत्याधुनिक पद्धतीने धावणार आहे. या मेट्रो मार्गावर ओव्हर हेड वायरसाठी खांब नसतील. तर मेट्रोला वीजपुरवठा हा रुळांमधून केला जाणार आहे. यालाच थर्ड रेल प्रणाली असे म्हटले जाते. यामुळे मेट्रो मार्गावर विजेचे खांब ना डोक्यावर विजेच्या तारा, असे चित्र दिसणार नाही.

पुणे शहरातील मेट्रो मध्ये भारतातील थर्ड रेल प्रणाली प्रथमच वापरली जाणार आहे. त्याबाबतच्या करारावर राज्य सरकार आणि ठेकेदार कंपनी यांच्यात नुकताच करार झाला आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या 23.3 किलोमीटरच्या उन्नत मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावर 23 स्थानके आहेत. या मेट्रोला थर्ड रेल प्रणाली अंतर्गत रुळांच्या शेजारून आणि खालून विद्युतपुरवठा केला जाणार आहे.

थर्ड रेल प्रणालीला लाइव्ह रेल, इलेक्ट्रिक रेल किंवा कंडक्टर रेल असेही म्हटले जाते. ही एक अर्ध-सतत कंडक्टरद्वारे मेट्रो गाडीला विद्युत पुरवठा करण्याची अत्याधुनिक पद्धत आहे. ती मेट्रो रुळावर धावत्या दोन्ही बाजूने समांतर किंवा रुळांच्या मध्ये बसवली जाते

मेट्रोच्या नियमित दोन रुळांच्या समांतर तिसरा विशिष्ट पिवळ्या रंगाचे पट्टे मारलेला एकेरी रूळ टाकला जातो. त्या मेट्रो गाडीला ् थेट खालून ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पॉवर’ पुरविली जाते. या पद्धतीने धावणाऱ्या गाड्यांना खालच्या बाजूला विद्युत संपर्कासाठी एक खास धातूची पेटी बसवण्यात येते, तिला ‘शूज’ असे म्हटले जाते. या शूजच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा होतो.

या संपूर्ण मार्गावर कुठेही गाडीच्या खांब किंवा डोक्यावर इलेक्ट्रिकच्या तारांचे जाळे दिसणार नाही. यामुळे पुणेरी मेट्रो हा पुणे शहराला अत्याधुनिक अशी ‘थर्ड रेल’ प्रणाली उपलब्ध करून देणारा पहिला प्रकल्प ठरणार आहे. तसेच या प्रणालीमुळे मेट्रोच्या पर्यायाने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

See also  भाजप नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर ?