पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘एका मंत्र्यांच्या स्वाक्षरीमुळे मार्ग रखडला

0
slider_4552

पिंपरी :

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाच्या विषय दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. आता फक्त एका मंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे. मी दिल्लीला गेल्यानंतर संबंधितांना भेटून त्यांची स्वाक्षरी घेणार आहे. त्यामुळे शहरवासीयांचे निगडी ते कात्रज मेट्रोचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मी कामाचा माणूस आहे. त्यामुळे राज्यातील विविध प्रश्‍नासंदर्भात बैठका घेतो, कामाची माहिती घेतो, अडचणी जाणून घेतो, त्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करतो.

स्वारगेटला मेट्रोसाठी भूमिगत काम करायचे आहे. त्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याशिवाय पर्याय नाही. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कामाला लागलो आहे.

See also  अजितदादांच्या बैठकीकडे चक्क मित्र पक्षाच्या खासदार, आमदारांनीच फिरवली पाठ