मॉडर्न कॉलेज गणेशखिंड, येथील मॉडर्न ट्रेकिंग क्लब ने कात्रज बोगदा ते सिंहगड किल्ल ट्रेक केला यशस्वी पूर्ण…

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालय पुणे येथे मॉडर्न ट्रेकिंग क्लब साधारणपणे २५ वर्षापुर्वी स्थापन करण्यात आलेला आहे. हा क्लब दरवर्षी एक मोठा ट्रेक घेऊन जातो. पूर्वी फक्त महाविद्यालयापुरता मर्यादित असलेला क्लब आता आंतरमहाविद्यालयीन झाला आहे.

नुकतेच या क्लबतर्फे कात्रज बोगदा ते सिंहगड किल्ला गिरिभ्रमण आयोजित केले होते. हा ट्रेक सकाळी साडे सात वाजता कात्रज बोगद्यापासुन सुरु झाला. पहिला हत्ती डोंगर हा अवघड टप्पा लवकरच पार केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बारा डोंगर पार केले. चांगल्या हवामानामुळे ट्रेक पूर्ण करण्यास काहीही अडचण आली नाही.

पहिला गट दुपारी बारा वाजता म्हणजे चार तासातच सिंहगडावर पोहोचला व नंतर टप्प्याटप्प्याने इतर गट किल्ल्यावर पोहोचले. शेवटचा गट संध्याकाळी सहा वाजता पोहोचला. अशा पद्धतीने गिरीभ्रमणाची यशस्वीपणे सांगता झाली. डॉ प्राची क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गावरील वनस्पतींची माहिती दिली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ट्रेकचा व्हिडिओ बनविलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा ट्रेक पहिला होता काही विद्यार्थ्यांसाठी हा ट्रेक आयुष्यातील पहिला होता. तरीही अडचणींवर मात करून त्या विद्यार्थ्यांनी हा ट्रेक पूर्ण केला.

या नंतरचा ट्रेक हा हरिश्चंद्र गड किंवा राजमाचीवर घेऊन जाऊ अशी माहिती ट्रेकचे डाॅ. संजय पाटील यांनी दिली. ते म्हणाले महाविद्यालयाच्या प्रोत्साहनामुळे ट्रेक यशस्वी होत आहे. प्राचार्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळते.

संचित बोंद्रे या पहिल्यांदा ट्रेकला गेला होता. परत परत मी निर्सगात जाणार आहे असे तो म्हणाला. प्राची चिंचोले म्हणाली, आम्ही या ट्रेकने सुरवात केली आहे. आता आम्ही सतत जात राहु. ट्रेकिंगची आवड लागली आहे. या ट्रेकमध्ये 160 विद्यार्थी व 15 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

 

See also  वृक्षांची होणारी तोड त्वरित थांबवा, मोठ्या संख्येने चिपको आंदोलन करत पुणेकरांनी दिला पुणे महानगरपालिकेला सणसणीत इशारा..