औंध :
औंध रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,स्पायसर रोड,भाऊ पाटील पडळ वस्ती येथील रस्त्याची झालेली दुरवस्था त्यामुळे होणारे अपघात यामुळे त्या रस्त्यांची दुरुती करणेबाबत तसेच विविध समस्या बाबत मनसेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय निवेदन देण्यात आले.
त्याचबरोबर पडळ वस्ती मधील जुनी झालेली चेंबर लाईन बदलण्यासाठी, तसेच आरोग्य विषयी प्रश्न सोडवण्यासाठी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांना मनसे स्थानिक शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले.
तसेच सदर काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल खळ खाट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.या प्रसंगी दत्ता रणदिवे, अमर अढाळगे, जितेंद्र कांबळे सिद्धांत अडसूळ उपस्थित होते.