दिल्ली :
मनी लॉड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत एक सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेबृवारी २०२२ मध्ये अटक
झाल्यापासून नवाब मलिक तुरुंगात आहेत.
दोन महिन्यांचा जामीन मंजूर याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या सात महिन्यांपासून अटकेत असलेले नवाब मलिक यांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांना दोन
महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.मनी लॉर्डिंग प्रकरण तसेच अंडरवल्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर व हस्तकाशी सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
प्रकृतीच्या कारणावरून मिळाला जामीन..
याच प्रकरणात ईडीने नबाव मलिक यांना २३ फेब्रवारी २०२२ रोजी अटक केली होती. गेल्या सात महिन्यांपासून ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यासाठी त्यांनी वारंवार कोर्टाला विनंती केली होती. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे
ईडीने (ED) म्हणले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना फेब्रूवारी २०२२ मध्ये नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दीड
वर्षानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अजित पवार गटाच्या बंडानंतर नवाब मलिक यांच्या सुटकेच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे.