लोणावळा :
विकेंडनिमित्त मोठी गरदी झाली होती. सर्वाच्या आवडीचं ठिकाण असलेल्या भुशी धरणावर देखील पर्यटक आल्याने गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळालं. त्याचबरोबर टायगर पॉईट, लायन्स पॉईट याठिकाणी धुक्याची चादर पसरली होती. टायगर आणि लायन्स पॉईट धुक्यात हरवून गेलं होतं. महाराष्ट्रासाह देशभरातून पर्यटक वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले होते.
लोणावळ्यात वीकेंडला हमखास पर्यटकांची गर्दी होते.आज रविवार असल्याने अनेकांनी सु्ट्टिचा मुहुर्त पाहून लोणावळ्यात गर्दी केली होती. लोणावळ्यातील सर्वाच्या आवडीचं ठिकाण भुशी धरणावर देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले होते.त्याचबरोबर लायन्स पॉईट, टायगर पॉईट या ठिकाणी देखील पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद घेतला. पुणे, मुंबई यासह इतर शहरातून आणि महाराष्ट्राच्याका नाकोप्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते.