पावसाचा जोर ओसरला; पवना धरणाचा साठा ५१ टक्यांवर

0

पवना :

पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या 24 तासात केवळ 40 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 51 टक्यांवर गेला आहे.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 40 मिली मीटर

1 जूनपासून झालेला एकूण पाऊस – 1010 मिली मीटर

गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस – 1472 मिली मीटर

धरणातील सध्याचा पाणी साठा – 51.43 टक्के

गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 71.21 टक्के

गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 3.70 टक्के

1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 33.44 टक्के

See also  सध्याची द्वेषाचा रोग लागलेली राजकीय भाषा पाहता, त्यावर उपचारासाठी होमिओपॅथीने पुढाकार : अ‍ॅड. उज्ज्वल निकम