बाणेर :
पुण्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी मधील भाजपा युवा नेते आणि बालेवाडी वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य मोरेश्वर बालवडकर यांच्या वतीने गरजु रुग्णांना संजीवनी देण्याकरिता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आव्हान केल्याप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आर्थिक मदतीचा धनादेश सुपुर्त केला.
याबद्दल माहिती देताना मोरेश्वर बालवडकर म्हणाले की, आमचे मार्गदर्शक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवस कसा साजरा केला जावा याचे उत्तम उदाहरण नेहमीच दाखवून दिले आहे. यावेळी त्यांनी गरजु रुग्णांना संजीवनी देण्याकरिता आर्थिक मदत करण्याचं आव्हान केले. अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाला आपला हात भार लागावा म्हणून माझ्या वतीने खारीचा वाटा उचलत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त केला व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा युवा नेते लहू बालवडकर, बालेवाडी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश रोकडे, ॲड. माशाळकर, शकील सलाटी हे मान्यवर उपस्थित होते.