महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या फ्रँचाईजींचा लिलावात पुणे संघाचा आयकॉन खेळाडू ऋतुराज गायकवाड..

0
slider_4552

पुणे :

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या पाठिंब्याने झालेल्या T20 फ्रँचायझी लीगमध्ये पुणे फ्रँचायझीला विक्रमी 14.80 कोटी रुपये मिळाले. पुण्यानेच ऋतुराज गायकवाडवर आयकॉन खेळाडू म्हणून बोली लावली होती. त्याला या फ्रँचायझीचा कर्णधारपदही देण्यात आलं आहे.
IPL नंतर आता महाराष्ट्र प्रीमियर लीगचे (MPL) आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या फ्रँचाईजींचा लिलाव शनिवारी ३ जून रोजी पार पडला.

महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील सहभागी होणाऱ्या 6 संघांपैकी एक संघाने त्याला आपल्या संघाचं कर्णधारपद केलं आहे. 15 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून सर्व सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहेत.

आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याचबरोबर यंदाच्या मोसमातही त्याने महत्त्वाच्या खेळी केल्या. ऋतुराज गायकवाडने IPL 2023 च्या 16 सामन्यांमध्ये 590 धावा केल्या आहेत ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय गायकवाडने टीम इंडियासाठी 1 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत.

या लिलावात सहा संघाच्या फँचाईजीसाठी तब्बल ५७.८० कोटी रूपयांची बोली लागल्या. पुणे येथे झालेल्या लिलावात २० इच्छुकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील सर्वात महागडी बोली पुणे फँचाईजीसाठी लागली.

महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL)

(संघमालक-फ्रेंचाइजी-बोली-आयकॉन)

प्रवीण मसाले – पुणे संघ – १४.८ कोटी रूपये – ऋतुराज गायकवाड

उद्योजक पुनीत बालन – कोल्हापूर संघ – ११ कोटी रूपये – केदार जाधव

ईगल इन्फ्रा – नाशिक संघ – ९.१० कोटी रूपये – राहुल त्रिपाठी

व्यंकटेश्वर – छत्रपती संभाजीनगर संघ – ८.७० कोटी रूपये – राजवर्धन हंगरगेकर

जेटसिंथेसिस इंडिया – रत्नागिरी संघ – ८.३० कोटी रूपये – अझीम काझी

कपिल सन्स – सोलापूर संघ – ७ कोटी रूपये – विकी ओस्तवाल

See also  भारताचा श्रीलंकेवर ४ गडी राखत शानदार विजय, मालिकाही जिंकली..