औंध येथील महादजी शिंदे रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी रस्ता रोको आंदोलन.

0
slider_4552

औंध :

ॲड. डॉ. मधुकर मुसळे व नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या नेतृत्वाखाली औंध भागातील नागरिकांनी भर दुपारी एक वाजता रस्त्यावर उतरून औंध मधील अतीशय महत्वाचा महादजी शिंदे रस्ता रुंदीकरण झालेच पाहिजे या मागणीसाठी, या रस्त्यावर भाले चौकात रस्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनाची माहिती देताना ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांनी सांगितले की, निधी उपलब्ध करून देऊनही प्रशासन हे काम करण्यासाठी टाळाटाळ करत असून गेली अनेक वर्षापासून ह्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले नाही. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 18 कोटी रुपयांची तरतूद करून टेंडर काढून सुद्धा हे काम केले नाही. आता पुणे मनपाच्या 52 कोटीच्या पॅकेज पण यासाठी तरतूद करून घेऊनही प्रशासन काम करण्यास टाळाटाळ करीत आहे.

सांगवी च्या बाजूने येणारी 200 फुटी रस्त्यावरील वाहतूक, शंभर फुटी नागरस रोड , शंभर फुटी डीपी रोड , वायरलेस फोरम रस्ता, कुमार क्लासिक रस्ता, मंगेश सोसायटी, नव पिनॅक सोसायटी रस्ता अशा अनेक रस्त्याची वाहतूक औंध मधील सर्वात जास्त कमर्शियल भाग असलेल्या या वेस्टर्न मॉल समोरील तीस फुटी रुंद असलेल्या महादजी शिंदे रस्त्यावर येते त्यामुळे येथे कायम वाहतूक कोंडी असते. अनावश्यक असलेल्या डी मार्ट च्या समोरील भागात फक्त काँक्रीट चा तुकडा करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. हे काम थांबवून संपूर्ण रस्ता रुंदीकरण झाले पाहिजे या मागणीसाठी औंध भागातील नागरिक रस्त्यावर उतरले.

मॉलच्या मालकाला मदत करण्यासाठी व त्यांची रस्ता रुंदीकरणातील जागा ताब्यात घेण्यासाठी फालतू कारणे देत प्रशासन टाळाटाळ असल्याचा आरोप यावेळी ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांनी केला.

पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आंदोलन स्थळी भेट देउन संबंधित अधिकारी सोबत बैठक लावून रस्त्यांची कामे मार्गी लावली जाईल यासाठी प्रयत्न करू अशे आश्वासन दिले.

यावेळी अरुण भापकर, विद्याधर भापकर, निलेश जुनवणे, सतीश जोशी, प्रकाश खोले, निलेश दीक्षित, व्यंकट पिल्ले, वासुदेव देशपांडे, श्रीयुत खटावकर, गोपाल घाटोळ, सहस्त्रबुद्धे, डॉक्टर शोभा चांदोरकर, डॉक्टर प्रियदर्शनी कुलकर्णी, श्री व सौ नंदकुमार कुलकर्णी, श्रीमती अपर्णा अत्रे, श्री राजेंद्र शेठ , श्रीयुत मोदी, श्री मानसिंग ढेकणे, भारत निहालानी, सुषमा शालिग्राम, प्रीती बर्वे, आशा दातार, रेणुका जोशी, सौ चित्रा कुलकर्णी श्री किरण पांचाळ, विराज पांचाळ, अभिजीत कुलकर्णी, मिसेस साठे , जमदग्नी विनय शामराज, अशोक पाठक, रमेश काळे, विद्याधर गुजर, मिलिंद कदम, गोपाळ कोळी, राजेश भोसले, प्रसाद शिंदे, वैभव कसबे, अनिल अमीरेड्डी इत्यादी सह अनेक नागरिक उपस्थित होते.

See also  पुणे शहर काँग्रेसला बळ : उद्योजक गणेश गायकवाड यांचा काँग्रेस प्रवेश.