पुणे महानगरपालिकेकडे ‘मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर’ या अभियानाअंतर्गत जमा झाल्या 30 टन वस्तू…

0

पुणे :

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर’ या अभियानाअंतर्गत रिड्यूस, रियूज आणि रिसायकल केंद्रांमध्ये 15 दिवसांत तब्बल 30 टन वस्तू जमा झाल्या आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने “मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ या अभियानाअंतर्गत तीन आठवड्यांसाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना “आरआरआर’ (रिड्यूस, रीयुज, रिसायकल) केंद्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विविध गृहनिर्माण सोसायट्या, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मोकळे मैदान, बाजारपेठा आदी ठिकाणी ही केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. ही केंद्रे चार जूनपर्यंत दररोज सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत खुली असतील.

जुनी पुस्तके, पेपर, मासिके, पुठ्ठे, प्लॅस्टिक, थर्माकोल, फर्निचर, काचेच्या बाटल्या, भांडी, ई-कचरा, जुने कपडे, पादत्राणे आणि इतर वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी या केंद्रात आणून देता येतील. सुमारे 1200 नागरिकांनी आपल्याकडील वस्तू आणून दिल्या आहेत. एकूण 30 टन जुन्या वस्तू जमा झाल्या आहेत. यामध्ये 56 टक्के कपडे, आठ टक्के ई-वेस्ट, नऊ टक्के पुस्तके आणि 27 टक्के खेळणी, पादत्राणे, भांडी, शोभेच्या वस्तू, बॅग्स यांचा समावेश आहे, अशी माहिती घनकचरा विभागप्रमुख आशा राऊत यांनी दिली.

See also  ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयता द्यायच्या ऐवजी वही पेन पुस्तक देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे