औंध रोड – खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथिल वाहतूक कोंडी सोडविण्यासठी पुणे जिल्हाधिकारी सोबत बैठक…

0
slider_4552

खडकी :

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील विविध नागरिकांच्या विषयासंबंधी पुणे जिल्हाधिकारी मा.डॉ. राजेश देशमुख आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची सविस्तर बैठक पार पडली. यामध्ये प्रामुख्याने औंध रोड – खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यावर चर्चा करण्यात आली.

औंध रोड – खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथे सततची वाहतूक कोंडी होत असते. यामुळे नागरिकांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत असून त्यांचा वेळ सुद्धा वाया जातो. याबाबत सदरील भागातील नागरिकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने मी स्वतः व वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त, पुणे मनपा पथ विभागाचे अधिकारी, ए.एफ.के. (Ammunition Factory Khadki) चे अधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेबरोबर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी देखील केली होती. असे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितले की, या पाहणीदरम्यान असे निदर्शनास आले होते की त्याठिकाणच्या जागेसंदर्भात ए.एफ.के. (Ammunition Factory Khadki), डिफेन्स इस्टेट ऑफिस, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे मनपा, व सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व विभागांमध्ये रस्त्याच्या मालकीबाबत समन्वयाचा अभाव होता.

या वहातुक कोंडीच्या समस्येवर आज या सर्व विभागांची एकत्रित बैठक घेण्यात आली व त्याठीकाणच्या जागेसंदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी या विभागांकडून एक सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असून लवकरच याठीकाणची वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

See also  औंध रोड -खडकी जंक्शन स्टेशन येथील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेणार : आमदार सिद्धार्थ शिरोळे