वारजे :
गणेशखिंड येथिल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज कॉमर्स फॅकल्टी: फ्युचर बँकर्स फोरम हे आता डिपॉझिटर्स एज्युकेशन अवेअरनेस फंड RBI (DEAF RBI) चे मान्यताप्राप्त वित्तीय साक्षरता केंद्र आहे. 6 मे 2023, शनिवारी ‘अर्बन’ क्षेत्र वारजे माळवाडी पुणे येथे पहिल्या प्रायोगिक अनुदानित प्रकल्पांतर्गत तिसरा प्रकल्प राबविण्यात आला.
याचा लक्ष्य गट ( SHG: SELF HELP GROUP) बचत गट होता. या कार्यक्रमा अंतर्गत बचत गटातील महिलांना आर्थिक साक्षरता फोल्डर वितरित केले आहे आणि PMJJBY, PMSBY, APY, सुकन्या समृद्धी योजना, सुरक्षित डिजिटल बँकिंग, बँकिंग लोकपाल इत्यादी विविध योजनांवर संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँक मित्र स्वयंसेवकांनी दृकश्राव्य प्लॅटफॉर्मद्वारे पथनाट्य सादर केले आणि SHG च्या महिलांमध्ये सामाजिक सुरक्षा योजनांचे महत्त्व, NPA चे परिणाम, OTP सामायिक करण्याचा परिणाम आणि वृद्ध नागरिकांसाठी डोअर स्टेप बँकिंग याविषयी जागरुकता पसरवली. सभागृहात विविध पैलूंवर आर्थिक साक्षरतेचे पोस्टर्स प्रदर्शित केले तसेच एक संच वारजे माळवाडी येथील बचत गटाच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यासाठी देण्यात आला.
पहिल्या सत्रात श्री. सुधीर दफ्तरदार ज्येष्ठ बँकर आणि शिक्षणतज्ज्ञ आणि दुसऱ्या सत्रात श्रीमती सुमेधा देशपांडे,माणदेशी बँक, उपस्थित होत्या. त्यांनी अनिवार्य आणि पर्यायी मॉड्यूलवर DEAF RBI ने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित लक्ष्य गटाला मार्गदर्शन केले. वारजे माळवाडी येथील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन दोडके व सौ.शांता नेवासे यांनी आर्थिक साक्षरता कार्यक्रमाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमासाठी वारजे माळवाडी येथील स्वयंसहाय्यता गटातील 63 सहभागी झाले होते. MCOM विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचा भाग म्हणून सर्वेक्षण केले. मॉडर्न कॉलेज वारजेच्या प्राचार्या डॉ. वर्षा बापट मॅडम उपस्थित होत्या.
या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा प्रा विजया कुलकर्णी यांनी आखली. कार्यक्रमात सुत्रसंचलन डाॅ मंजुषा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सन्मवय डाॅ पल्लवी निखारे व अँडव्होकेट अदिती पिंपळे यांनी केले. उपप्राचार्य डाॅ शुभांगी जोशी यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी राष्ट्रीय साक्षरता अभियानात सहभागी होऊन देशसेवा करायला मिळत आहे अशी भावना व्यक्त केली.
आर्थिक साक्षरता ही आपली राष्ट्रीय वचनबद्धता आहे