बालेवाडी :
बालेवाडी येथील साई चौकाजवळील कचरा वर्गीकरणाच्या शेडला मोठी आग लागली आहे आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी स्फोट ऐकू येत असल्याचे सांगितले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आगीवर नियंत्रण मिळवत असून, घटनास्थळी पोलीस हवालदार उपस्थित आहेत.
या बद्दल माहिती देताना बालेवाडी वेल्फेअर असोसिएशन चे अमेय जगताप यांनी सांगितले की, ही माहिती मला ४३ प्रायव्हेट सोसायटीच्या रहिवाशांनी दिली. मी तिथे पोहोचलो तेव्हा मेट्रोच्या लोकांनी रस्ता आधीच बंद केला होता. मी स्वतः हे शेड हलवण्यासाठी अनेक वेळा अनेक महिने पालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मागच्या मोहोल्ला कमिटी च्या मिटिंग मध्ये लेखी पत्र दिले होते. परंतू पालिकेच्याच हलगर्जी पणामुळे अश्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
सुदैवाने फार मोठे संकट अग्निशमन दल पोचल्याने झाले नाही. जवळ असणारे भंगार दुकान जळून खाक झाले आहे.
*बालेवाडी येथील साई चौकात कचरा वर्गीकरणाच्या शेडला मोठी आग..*