नागरिकांच्या सोईचा महाराष्ट्र घडविण्याची वाटचाल सुरू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
slider_4552

मुंबई :

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आमच्या सरकारने विकासाच्या विविध प्रकल्पांना दिलेली गती लक्षात घेता नागरिकांच्या सोईचा महाराष्ट्र घडविण्याची वाटचाल सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था, जिव्हाळा ठेऊन काम करावे आणि आपल्या कारकीर्दीची छाप शहर विकासावर सोडावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील महापालिका आयुक्त, नगरपालिका, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना केले.

येथील एनसीपीएच्या सभागृहात नगरविकास दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी यावेळी उपस्थित होते.

पुरस्कारांच्या रकमेत भरघोस वाढ

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात नागरीकरण वेगाने होत आहे. त्यासाठी मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून वाढत्या नागरिकरणाला सोयी देण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यंदा नगरविकास विभागाने घेतलेल्या स्पर्तील विजेत्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांना देण्यात आलेल्या विविध पुरस्कारांच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्याच उपयोग शहराच्या सुशोभीकरणासाठी योग्य पद्धतीने करावा. शहरांची स्वच्छता करताना लोकसहभाग वाढवा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

See also  तर ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता : दिपक केसरकर