जम्मू-काश्मिर :
जम्मू-काश्मिरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ल्यामुळे लष्काराच्या वाहनाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना भाटादाडिया भागात घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कारातील उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
लष्काराच्या वाहनावर हल्ला
राजौरी सेक्टरमधील भीमबेर आणि पुंछ दरम्यानवच्या महामार्गावरुन दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भारतीय लष्काराचं वाहन जात होतं. यावेळी वाहनावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्लाही केल्याचं बोललं जात आहे. यामुळे वाहनाला आग लागली. पाऊस आणि धुकट वातावरणाचा फायदा उचलत हा अतिरेकी हल्ला करण्यात आला.
पाच जवान शहीद
या भागात तैनात असलेल्या अतिरेकी विरोधी पथकातल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले. तर एक जवान गंभीर जखमी झालाय. जखमी जवानाला राजौरी इथल्या सेनेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अतिरेक्यांविरोधात परिसरा तात्काळ सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.