कितीही दबाव आला तरी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाणार नाही, ज्यांना जायचे त्यांचा वैयक्तिक निर्णय…

0

मुंबई :

गेल्या काही दिवसापासून अजित पवार महाआघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फुटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली.

या संधर्भात माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. काही लोक दबावाला बळी पडू शकतात. मात्र, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. महाविकास आघाडीत फूट पडणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याचे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, मी व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पवारांनी महाविकास आघाडी आणि राज्यातील राजकारण यासंदर्भात महत्वाची भूमिका मांडली. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षाचे नेते फोडायचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. आमदार फोडले. आदित्य ठाकरे यांनी यावर खुलासा केलाय, कसे नेते रडत होते. आम्हाला तुरुंगात जायचं नाही. तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत वापरलं जातआहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही लोकांबाबत ही चर्चा आहे,हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे. यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे, असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असेही पवार म्हणाले आहेत.

See also  शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर...