सनराईजर्स हैदराबादनं कोलकाता नाईट नाईडर्स विरुद्धचा सामना 23 धावांनी जिंकला.

0
slider_4552

मुंबई :

आयपीएल 2023 स्पर्धेत सनराईजर्स हैदराबादनं कोलकाता नाईट नाईडर्स विरुद्धचा सामना 23 धावांनी जिंकला. या विजयासह हैदराबादनं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

चार गुणांसह हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे. हैदराबादनं विजयासाठी 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण कोलकाता संघाला 20 षटकात 7 गडी गमवून 205 धावा करता आल्या. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगल्याने क्रीडा रसिकांची धाकधूक वाढली होती. पण नितीश राणा आणि रिंकु सिंह यांची अर्धशतकी खेळी वाया गेली असंच म्हणावं लागेल. शेवटच्या षटकात तशी कमाल पुन्हा करता आली नाही. त्यामुळे सलग तीन विजय मिळवण्याचं कोलकात्याचं स्वप्न भंगलं. स्पर्धेतील संघांचे गुण पाहता चांगली चुरस निर्माण होणार आहे.

हैदराबादनं विजयासाठी दिलेल्या 229 धावांचा पाठलाग करण्यासाठी रेहमनुल्ला गुरबाज आणि नारायण जगदीसन ही जोडी मैदानात उतरली. पण तिसऱ्या चेंडूवर खातंही न खोलता गुरबाज भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेला वेंकटेश अय्यरही काही खास करू शकला नाही. मार्कोच्या गोलंदाजीवर अवघ्या 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला सुनिल नरीनही शून्यावर बाद झाला. त्यामुळे संघावर दबाव वाढला

कर्णधार नितीश राणा मैदानात आला आणि जगदीसनसोबत चांगली भागीदारी केली. आक्रमक खेळी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. ही जोडी फोडण्यात मयंक मार्केंडयला यश आलं. जगदीसन 36 धावांवर असताना त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

आंद्रे रसेल संघावरील दबाव दूर करण्यासाठी उत्तुंग फटका मारला. पण चेंडू खूप वर चढल्यानं मार्को जानसेननं कसलीही चूक न करता त्याचा झेल घेतला. त्यानंतर नितीश राणा आणि रिंकु सिंह जोडीने कमाल केली. सहाव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दरम्यान नितीशला झेल सोडल्याने जीवदान मिळालं. आक्रमक खेळी करताना टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 41 चेंडूत 75 धावा केल्या. त्यानंतर शार्दुल ठाकून 7 चेंडूत 12 धावा करून बाद झाला.

See also  हर्षवर्धन सदगीर, नरेश म्हात्रे, राकेश देशमुख यांची गादी विभागातून, माती विभागातून शुभम शिदनाळे, सिकंदर शेख यांची आगेकूच.. माती गटातून माउली जमदाडे पराभूत ; पुण्याच्या प्रतीक जगतापला सुवर्णपदक.

हैदराबादकडून मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रूक ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी चांगली खेळी केली. तर हॅरी ब्रूकने आक्रमक खेळी केली. पण 9 धावांवर असताना मयंक अग्रवाल बाद झाला. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर वरुण चक्रवर्थीने त्याचा झेल घेतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीही काही खास करू शकला नाही. दोन चौकार मारल्यानंतर आंद्रे रसेलनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ब्रूक आणि मार्करमनं हैदराबादचा डाव सावरला. मार्करमने आक्रमक फटकेबाजी करत 50 धावा ठोकल्या. पण उत्तुंग फटका मारताना वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

अभिषेक शर्माने मैदानात येत आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. मात्र आंद्रे रसेलच्या गोलंदाजी झेलबाद झाला. त्यानंतर ब्रूक्सन मोर्चा सांभाळला आणि शतकी खेळी केली. त्याने 55 चेंडूत 100 धावा केल्या.