औंध :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नाना गोपीनाथ वाळके, उपविभाग प्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याबद्दल माहिती देताना नाना गोपीनाथ वाळके, उपविभाग प्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी प्रकृती खालावत गेल्याने रायगडावर वयाच्या 50 व्या वर्षी झाला. आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३४३ वी पुण्यतिथी आहे. एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षरांनी आजतायगत कोरीव केले आहे आणि तसेच कायम राहील. अशा आपल्या आराध्य दैवतास विनम्र अभिवादन.
यावेळी मा. योगेश जुनवणे, अध्यक्ष औंधगाव विश्वस्त मंडळ, सचिन नखाते अध्यक्ष औंध प्रभाग ८ ( ठाकरे गट शिवसेना), रुपेश जुनवणे, यतीन यादव, सचिन कडूसकर ( गुरुजी ), निलेश गोळे आदी उपस्थित होते.