बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, म्हाळुंगे ची २४x७ समान पाणी पुरवठा योजना आढावा बैठक संपन्न

0
slider_4552

बालेवाडी :

२४×७ समान पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील आणि पुणे मनपाचे आयुक्त मा. श्री. विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

सफा बँक्वेट हॉल, लक्ष्मण नगर, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी जवळ, बालेवाडी हाय स्ट्रीट-२ येथे संपन्न झालेल्या या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख श्री. अनिरुद्ध पावसकर साहेबांनी सदरील २४x७ पाणी पुरवठा योजनेचा आढावा व बाणेर-बालेवाडी येथे विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यावरील उपाय योजना बाबत सादरीकरण केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

*पहा बालेवाडी येथे 24×7 समान पाणी पुरवठा आढावा बैठक संपन्न…*

_Link 🔗 click करून subscribe करा_

२४x७ अंतर्गत असणाऱ्या या प्रकल्पाचे ट्रान्समिशन लाईन्स चे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होऊन, वारजे येथील पंपांचे काम मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होऊन सर्वांना २४ तास ७ दिवस पाणी पुरवठा मिळेल असे मनपा आयुक्त मा. श्री. विक्रमजी कुमार यांनी आश्वस्त केले.

२४ x ७ समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांबाबत वारंवार आढावा घेत असुन पुढील दोन महिन्यांमध्ये हे काम पुर्ण करण्यात येईल तसेच तो पर्यंत ज्या सोसायट्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे त्यांना माझ्या स्वःखर्चातुन टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठीची उपाय योजना करण्यात येईल असे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील यांनी सोसायटी नागरिकांनी तसेच बालेवाडी फेडरेशन ने सांगितलेल्या अडचणींना उत्तर देताना सागितले.

यावेळी २४ x ७ हा भाजपाचा पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सुरुवातीपासुनच हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मधल्या कोरोना काळामुळे या कामास विलंब झाला असुन आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. तसेच सुस म्हाळुंगे येथेल नवीन पाण्याच्या ट्रान्समिशनचे लाईन व टाकीच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसात होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल असे मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.

See also  बाणेर बालेवाडी मेडीकॉस असोसिएशन चा स्पोर्ट्स डे साजरा..

याप्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, कोथरुड वि. भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, लहु बालवडकर, सचिन दळवी, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, उमाताई गाडगिळ, मा.सरपंच नारायण चांदेरे, मोरेश्वर बालवडकर, मा.सरपंच काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे, अस्मिता करंदिकर, सुभाष भोळ, मंदार राराविकर, रोहित पाटील, मीना पारगावकर तसेच पुणे मनपा पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, परिसरातील सोसायटींचे सभासद व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.