महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, न्यायालयाने निकाल राखून ठेवला…

0

नवी दिल्ली :

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. आता कोर्ट काय निकाल देतं? दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायलयाने समजून घेतला असुन सुनावणी आता पुर्ण झाली असुन निकाल राखून ठेवलेला आहे. लवकरच तो जाहिर होईल. निकाल काय असे यावर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

कोर्टात आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवला असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने आज लगचे निकाल जाहीर केलेला नाही. पण हा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जो गोष्टीची उत्कंठा शिगेला लागली होती, ती गोष्ट आता लवकरच स्पष्ट होणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आता निकाल लागणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची खरी? कुणाची बाजू एकदम खरी? कोण खरं आणि कोण खोट्टं? कुणाच्या वकिलांनी अतिशय योग्य युक्तिवाद केला ते आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

संसदीय पक्षाला स्वतःची अशी ओळख नसते. संसदीय पक्ष हा फक्त पक्षाचा काही भाग असतो. तसेच संसदीय पक्षातील सदस्यांवर पक्षाचे धोरण पाळणे बंधनकारक असते. ते स्वतः कोणताही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकत नसतात. त्यामुळेच प्रतोद नियुक्ती पक्ष करतो. संसदीय पक्ष नाही. त्यामुळे शिंदे ठाकरे खटल्यात शिंदे गटाने मांडलेले सर्व मुद्दे निरर्थक ठरतात, असे ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांनी स्पष्ट केले.

आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत जबरदस्त युक्तिवाद केला आहे. यांनी या सत्तासंघर्षामधील बारक्यावर आज नेमकेपणाने बोट दाखवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे कारण, त्यांची मानसिकता, राज्यपालांची भूमिका, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातील फरक आणि गटनेते यांच्या नियुक्तांची पद्धत यावर सिब्बल यांनी थोडा प्रकाश टाकला आहे. पक्षासाठी नव्हेच तर लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही उभे आहोत हे सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा सिद्ध केले आहे

See also  संविधानाच्या बचावासाठी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी 'युनियन ऑफ स्टेटस' स्थापन करण्याचा प्रस्ताव : ममता बॅनर्जी