भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका सलग चौथ्यांदा जिंकण्याचा केला पराक्रम.

0
slider_4552

अहमदाबाद :

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका सलग चौथ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरची कसोटी अनिर्णित राहिली अन् भारताने 2-1 फरकाने मालिका खिशात घातली.

ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला कसोटी मालिकेत सलग चौथ्यांदा लोळविण्याची किमया करणारा हिंदुस्थान हा पहिला आशियाई संघ ठरला, हे विशेष. एवढेच नव्हे, तर ‘टीम इंडिया’ने मायदेशात सलग सहाव्यांदा या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला लोळवले. तीन वर्षांनंतर कसोटी शतकाचा दुष्काळ संपविणारा विराट कोहली चौथ्या कसोटीतील सामनावीर ठरला, तर मालिकाविराचा बहुमान रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा यांना विभागून देण्यात आला.

ऑस्ट्रेलियाने 480 धावसंख्या उभारल्यानंतर प्रत्युत्तरात हिंदुस्थानने 571 धावसंख्या उभारून पहिल्या डावात 91 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाच्या बिनबाद 3 धावसंख्येवरून सोमवारी सकाळी दुसऱया डावात पुढे खेळायला सुरुवात केली. रविचंद्रन अश्विनने मॅथ्यू कुहनेमनला (6) पायचित पकडून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. कुहनेमन बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 14 धावा झाल्या होत्या.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारताने 2004 नंतर मायदेशात सलग सहाव्यांदा ही मालिका जिंकली. याचबरोबर लागोपाठ चौथ्यांदा ही मालिका जिंकताना दोनवेळा मायदेशात, तर दोन वेळा ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली आहे.

अक्षर पटेल हा 12 कसोटींत 500 धावा आणि 50 बळी टिपणारा क्रिकेटविश्वातील 5वा खेळाडू ठरला. 12 कसोटींत 513 धावा करणाऱया अक्षरने ट्रव्हिस हेडचा त्रिफळा उडवून 50वा कसोटी बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 480 धावा.

हिंदुस्थान : पहिला डाव : 571 धावा.

ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव : 78.1 षटकांत 2 बाद 175 धावा (कसोटी अनिर्णित)

See also  ऑलिम्पिक इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय महिला हॉकी टीम सेमी फायनलमध्ये