पाषाण आयटीआय मैदानावर करण्यात येणाऱ्या फुटबॉल मैदानास स्थानिकांचा विरोध…. नागरिकांनी केले प्रशासना विरोधात आंदोलन…!

0

पाषाण :

पाषाण साई चौक जवळील, सुस रोड -सुतारवाडी लिंक रोड येथे असणारे आय टी आय मैदान पुणे महानगरपालिका साकारू इच्छित आहे. या फुटबॉल मैदानाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत जोरदार आक्षेप घेत आंदोलन करत निषेध नोंदविला.

पाषाण परीसर हा तळे डोंगर असा सुसज्ज आहे. परंतु या भागात मुलांना खेळण्यासाठी वयोवृद्ध नागरीकांना फिरण्यासाठी व्यायामासाठी एकमेव शिल्लक असलेले आयटीआय मैदान. यात सध्या पुणे महानगर पालिका फुटबॉल टर्फ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात लहान मोठी मुले मोठया प्रमाणात क्रिकेट खेळत असतात. नागरीक चालायला येत असतात. त्यात फुटबॉल मैदान बनवून खासगी व्यक्तीला चालवायला देण्याचा घाट महानगरपालिकेने घातलाय याला नागरिकांनी एकत्र येऊन सर्व पक्षीय नेत्यांसोबत विरोध दर्शवत आंदोलन केले.

यावेळी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत मैदान बंदिस्त होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले. पाषाण सुतारवाडी परिसरातील एकमेव मैदान सर्वांसाठी उपलब्ध राहावे म्हणून सर्व जण एकत्र येवून फुटबॉल मैदान होऊ देणार नाही, असा संकल्प सोडत पुढे गरज पडल्यास महानगरपालिकेत जाऊन आंदोलन करू असे यावेळी सांगण्यात आले.

*पहा पाषाण सुतारवाडी रस्त्यावरील आयटीआय मैदान वाचविण्यासाठी नागरिकांचे जोरदार आंदोलन..*

Subscribe करा आणि पहा आपल्या परिसरातील घडामोडी

यावेळी परिसरातील माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, सर्व पक्षीय नेते, परिसरातील तरुण वर्ग वयोवृध्द नागरिक, आणि सोसायटी मधील नागरीक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अनेक नागरीकांनी या आंदोलनात सहभागी होऊन निषेध व्यक्त केला.

See also  कडकडीत थंडीतही शिवसैनिक बेमुदत ठिय्या आंदोलनावर ठाम.