चिंचवड विधानसभेचे उमेदवार नाना काटे यांनी घेतली राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांची भेट..

0

पिंपरी :

चिंचवड विधानसभेचे उमेदवार नाना काटे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी प्रदेश मुख्य समन्वयक सुहासभाऊ उभे, भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रभाकर वाघेरे, उल्हासदादा पवार उपस्थित होते.

यावेळी नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. तसेच आगामी काळातील कामा संदर्भात देखील यावेळी खासदार शरद पवार यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले.

येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत आपण योग्य पद्धतीने नियोजन करून काम केल्यास विजय आपलाच असणार आहे. लोकांनाही आता बदल हवा असल्याने आपल्याला अत्यंत जबाबदारीने काम करावे लागणार आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून येणार्‍या महापालिका निवडणुकींच्या तयारीला आतापासून लागा. अशा सूचना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या.

See also  शिवसंस्कार सृष्टी’ हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात.