महिला आयपीएल क्रिकेट चा थरार आजपासून सुरू होणार..

0
slider_4552

मुंबई :

महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम सुरु होण्यासाठी काही तासच बाकी आहेत. T20 लीगचा पहिला सामना आज म्हणजेच ४ मार्चला सुरु होणार आहे.

T20 लीगचा पहिला सामना आज म्हणजेच ४ मार्चला सुरु होणार आहे. या हंगामाचा पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. नवी मुंबईमध्ये डीवाय पाटील स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट महिला खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया महिला संघाची दिग्गज खेळाडू बेथ मुनी गुजरात जायंट्स संघाची कर्णधारपदी विराजमान होणार आहे आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही मुंबई इंडियन्स महिला संघाची कर्णधार असणार आहे.

महिला क्रिकेट लीगचा पहिला सीजन सुरु होण्यासाठी सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती प्रतीक्षा आता जवळपासच आहे. या पहिल्या आवृत्तीमध्ये एकूण ५ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, युपी वॉरिअर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या महिला संघांचा समावेश आहे. पाहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही संघांमध्ये ऍशले गार्डनर व्यतिरिक्त सोफी डंकले देखील गुजरात जायंट्स संघात खेळणार आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स च्या महिला संघामध्ये हेली मॅथ्यूजशिवाय नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्या खेळला जाणारा सामना या हंगामाचे सामने थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहेत मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी होत असून सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.

See also  ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय हॉकी महिला संघाने पहिल्यांदाच मारली उपांत्यपूर्व फेरीत धडक