बाणेर :
बाणेर येथील सुविधा कडलग हिला एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी योगीराज पतसंस्थेने 25 हजार रुपयांची मदत एव्हरेस्ट वीर कृष्णा ढोकले व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे यांच्या शुभहस्ते देण्यात आली. तसेच याप्रसंगी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य पदी प्रकाश बालवडकर, किरण चांदेरे, महेंद्र धनकुडे, दत्तात्रय कळमकर यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्था आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक काम जोमाने करत आहे. यापूर्वी संस्थेने कला, क्रिडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा नेहमीच गौरव तसेच मदत केलेली आहे. तसेच कृष्णा पाटील, श्रीहरी तापकीर यांचा एव्हरेस्ट सर केल्याबद्दल संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कृष्णा ढोकले यांच्या पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लब ला युरोप मधील अतिउच्च शिखर एलबृस सर करण्यासाठी मदत केली होती आणि 15 ऑगस्ट रोजी देशाच्या झेंड्या बरोबर त्यांनी योगीराज पतसंस्थेचा फलक फडकावला होता. जिल्हा कबड्डी असोसिएशन मध्ये प्रथमच बाणेर बालेवाडी चे 4 सदस्य निवडून आले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी प्रगतशील शेतकरी सुभाष भिसे, स्मार्ट डिझाईन च्या संचालिका सुरेखा जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, संचालक गणेश तापकीर, अशोक रानवडे, संचालिका रंजना कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सिमा डोके, भाग्यशाली पठारे आणि सर्व स्टाफ व खातेदार उपस्थित होते.