मुंबई :
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारी व नियामक मंडळाची सभा आज मुंबई येथे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आ.अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन मध्ये निवडुन आलेल्या सभासदांचा सत्कार विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
मा.अजितदादा पवार व अध्यक्ष अतुल बेनके यांनी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढील प्रमाणे :
नियामक मंडळांचे अध्यक्ष : मधुकर नलावडे
सरकार्यवाहक : दत्तात्रय झिंजुर्डे
कार्याध्यक्ष : दत्तात्रय कळमकर
उपकार्याध्यक्ष : राजेंद्र काळोखे
कोषाध्यक्ष : प्रकाश पवार
उपकोषाध्यक्ष : प्रकाश बालवडकर
सहकार्यवाहक : राजेश ढमढेरे, दत्तात्रय माने, हनुमंत पवार, संदीप पायगुडे, ऋुषिकेश मद्रासी, शोभा भगत
क्रीडा साहित्य प्रमुख : अनिल यादव
पंच मंडळ अध्यक्ष : ईम्रान शेख
स्विकृत सदस्य : शंभु भोपळे, सतपाल गावडे, चंद्रकांत रणवरे, कुलदीप दराडे, वैष्णवी परांडे यांनी निवड करण्यात आली.