योगीराज पतसंस्थेला श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश मधील कृषी बॅंकिंग क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट……

0
slider_4552

बाणेर :

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन पुणे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश व भारतातील 53 प्रतिनिधींनी योगीराज पतसंस्थेला भेट दिली त्याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी योगीराज पतसंस्थेच्या वतीने सत्कार केला. तसेच संस्थेचे तज्ञ संचालक रविंद्र घाटे यांना जागतिक CSR परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल वामनीकॉम चे जॉइन्ट प्रोग्राम डायरेक्टर डॉ. डि रवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेची आर्थिक प्रगती कशी झाली तसेच संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती सांगितली. संस्थेला इतर देशातील कृषी बॅंकिंग क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी भेट देण्याचा प्रथमच योग आला आहे. संस्था करीत असलेल्या चांगल्या कामाची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवर घेत इतर देशाचे पदाधिकारी संस्थेच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी आले याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे असेही यावेळी सांगितले.

संस्थेचे तज्ञ संचालक तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांना जागतिक CSR दिना निमित्त, जागतिक CSR काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल “मोस्ट इम्पॅक्टफुल सोशल इनोव्हेटर्स लीडर्स” पुरस्कार वेदांत ग्रुपच्या श्री अनिल अग्रवाल फाऊंडेशनचे सीईओ डॉ भास्कर चॅटर्जी यांच्या शुभहस्ते नुकताच ताज लँड्स एंड, मुंबई येथे देण्यात आला याचाही मला अभिमान आहे. घाटे यांच्या रूपाने अभ्यासू आणि कर्तबगार संचालक संस्थेला मिळाला आहे असेही तापकीर यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी वर्धा नगरपालिकेचे नगरसेवक मनिष देवडे, वामनीकॉम चे जॉइन्ट प्रोग्राम डायरेक्टर डॉ. डि रवी, रिसर्च असोसिएट स्मिता कदम, योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे पाटील, कृष्णानगर शाखाध्यक्ष शंकरराव  सायकर,  संचालिका रंजना कोलते , संचालक गणेश तापकीर, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, व्यवस्थापिका सीमा डोके व सर्व स्टाफ उपस्थित होता.

आलेल्या सर्वांचे स्वागत व कृषी बॅंकिंग प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे रविंद्र घाटे यांनी दिली तर आभार संचालक अमर लोंढे यांनी मानले.

See also  आर के लक्ष्मण यांच्या कलाकृती नव्या पीढिने नक्कीच पाहाव्यात : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील