सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंग्रजी विभागातर्फे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0

पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इंग्रजी विभाग व राष्ट्रीय अनुवाद मिशन, म्हैसूर(सीआयआयएल) संस्थेच्या सहकार्याने “भाषांतर आणि अध्यापनशास्त्र’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात होणाऱ्या या परिषदेचे उद्‌घाटन प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते होईल. प्रख्यात इतिहासकार प्रा. राजा दीक्षित, सीआयआयएल म्हैसूरचे संचालक, प्रा. शैलेंद्र मोहन हे विशेष आमंत्रित म्हणून यावेळी उपस्थित राहतील.

अध्यापनशास्त्रीय पद्धती आणि सातत्याने विस्तारत असलेल्या भाषांतर क्षेत्रातील महत्वपूर्ण बदलांचा भारताच्या अनुषंगाने शोध घेण्याचा व वादविवादांमध्ये महत्त्वाच्या ठरू शकतील अशा मुद्‌द्‌यांवर विचारमंथन करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेमध्ये भारतातील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकिम भाषा अभ्यासक हजेरी लावणार आहेत. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक प्रा.सुकांता चौधरी यांचाही समावेश असेल.

परिषदेतील इतर नामवंत वक्त्‌यांमध्ये प्रा. उदय कुमार, प्रा. माया पंडित, प्रा. कमलाकर भट, प्रा. सुशांत मिश्रा, प्रा. निलाद्री शेखर दाश, प्रा. शोभा पवार, प्रा. मित्रा पारिख, डॉ. उमेश कुमार, डॉ. ऍनी रॉयसन, डॉ.तारिख खान, डॉ. कुणाल रे, डॉ. विक्की गायकवाड आदींचा समावेश आहे. तर, परिषदेचा समारोप प्रख्यात अनुवादक प्रा. मिलिंद मालशे यांच्या भाषणाने होईल.

See also  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शैक्षणिक धोरणाचा हेतू : दिपकजी केसरकर, शालेय शिक्षण मंञी