पुणे :
धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत. त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हजारो हिंदू नागरिक सहभागी झाले होते.
लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले होते.
सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस, महाळूंगे, बावधन, या परिसरातील नागरिकांनी, महिलांनी, आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा मध्ये सक्रिय सहभाग घेतला. जोरदार घोषणा देत बाणेर बालेवाडी येथून बाईक रॅली द्वारे नागरीक मोर्चा स्थळी पोचले.