सिकंदरवरून काही जण विनाकारण द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत : अजित पवार

0
slider_4552

पुणे :

नुकतीच मागच्या आठवड्यात पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. या स्पर्धेत पुण्याच्या शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी स्पर्धचा किताब पटकावला आहे. पण, सेमीफायनलमध्ये झालेल्या पैलवान सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड यांच्या लढतीत महेंद्र गायकवाडला दिलेल्या चार गुणांची चर्चा राज्यभर पाहायला मिळाली. यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत टांग कोणी कोणाला मारली यावरून गेली काही दिवस चर्चेचा धुराळा उडाला. त्यात कधी अंगाला माती न लावलेले, कधी लंगोट न घातलेले, बिना लंगोटीचे पुढे होते. हे खर तर वास्तव आहे. माझे म्हणणे आहे की जे खेळ करतात त्यांनी त्यात अधिकारवाणीने बोललं पाहिजे.

आमच्यासारख्यांनी तोंडाची वाफ वाया घालू नये. अस यावेळी पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच उत्तर भारतातील मल्लांना पराभवाच पाणी पाजनारा सिकंदर शेख हा देखील लढवय्या मल्ल आहे. त्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील उत्तम कामगिरी केली आहे. माझी विनंती आहे की, सिकंदरवरून काही जण समाजात विनाकारण द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. खेळाला जातीय स्वरूप देऊ नये. प्रत्येक मल्लाच धर्म हा कुस्ती असतो. त्यामुळे जाती पातीचा राजकारण करून खेळाला बदनाम करु नये असे देखील यावेळी पवार म्हणाले.

हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरीचा सन्मान – महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते पुणे जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या हिंदकेसरी पै. अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोघांनाही २ नवीन बुलेट सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड याचा देखील यावेळी सन्मान यावेळी करण्यात आले आहे.

 

See also  राष्ट्रीय स्पर्धेसाठी महिला व पुरूष कबड्डी संघाचे नेतृत्व पुण्याच्या स्नेहल शिंदे व नगरच्या शंकर गदई कडे..