पुणे :
भारताच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर खेळाडुंनी त्यांच्यावरील अन्यायाबाबत तसेच लैंगिक शोषण व मनमानी कारभारा विरूध्द जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय कुस्ती महासंघ चे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सुरू केले. या आंदोलनास पुणे शहरातील तालिम मधील वस्ताद यांनी जाहीर पाठींबा व्यक्त केला.
भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करून व खा.ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या माध्यमातून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी व मा.गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विजयराव जाधव-गुलसे तालीम, गोरखनाथ भिकुले-हमाल तालीम, राहूल वांजळे-मामासाहेब मोहोळ, केदार कदम औंध गाव तालीम, विकास रानवडे औंध गाव तालीम पुणे आदी मान्यवर उपस्थित होते.