भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंचे आरोप, क्रीडा मंत्रालयाने ७२ तासात उत्तर मागवले..

0
slider_4552

नवी दिल्ली :

आपल्या तक्रारी किंवा मागण्यांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, यावरून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह हे मनमानी कारभार करीत आहे. कैसरगंजचे भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या एकाधिकारशाहीला कुस्तीपटू कंटाळले आहे. त्यामुळे आम्ही निदर्शने-आंदोलन करीत असल्याचे देशातील अव्वल कुस्तीपटूंनी म्हटले आहे. नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर जमलेल्या 30 कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया व विनेश फोगटसह रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, विश्व पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा व राष्ट्रकुल विजेता सुमित मलिकचा प्रामु’याने समावेश आहे. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

बृजभूषण सिंह हे नॅशनल कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि अन्य कुस्तीपटू हे आंदोलनाला बसले आहेत. बृजभूषण सिंह हे हुकूमशाही करतात, त्यांनी महिला कुस्तीपटूंचे शारीरिक शोषण केले आहे, असे आरोप या कुस्तीपटूंनी केले आहेत.

बृजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शौषण केलंय. तसेच डब्ल्यूएफआयच्या अधिकाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने केला आहे. मी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितंल आहे. आता मला माहित नाही की तो (बृजभूषण) मला जगू देईल की नाही. मला वारंवार जीवे मारण्याची धमकी येत आहे’, असं विनेश फोगाटने म्हटलं आहे.

अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप

महिला कुस्तीपटूंना विविध प्रकारच्या समस्या असतात. मात्र, अध्यक्षांकडून महिला खेळाडूंचं शोषण करण्यात आलं. ज्या महिलांनी या गोष्टीला नकार दिला त्या खेळाडूंवर फेडरेशन जाणीवपूर्वक बंदी घातली असल्याचा आरोपही विनेश फोगाटने केला आहे. इतकंच नाही तर, कोणत्याही खेळाडूला काहीही झालं तरी त्याला जबाबदार अध्यक्ष राहतील, असा इशाराही त्यांनी कुस्ती फेडरेशनला दिला आहे.

आरोपानंतर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांनी आदोलन केलं आहे. दरम्यान, या आरोपाचं गांभीर्य लक्षात घेऊन क्रीडा मंत्रालयाने कुस्तीगीर संघटनेला नोटीस पाठवून या आरोपांवर 72 तासांत उत्तर देण्यास सांगितले आहेत. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्याच्या मागणीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

See also  इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील २ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

बृजभूषण सिंह यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, महिला कुस्तीपटूंच्या या आरोपांनंतर बृजभूषण सिंह यांनी तत्काळ समोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून असं काही घडलं असल्यास मी स्वतः फाशी घेईन, लैंगिक शोषणाचा कोणताही प्रकार झालेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.