विविध विषयांवर चर्चा करत जी २० पायाभूत सुविधा कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा समारोप..

0

पुणे :

भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा 17 जानेवारी 2023 रोजी पुण्यात समारोप झाला. या बैठकीला 18 सदस्य देश, 8 अतिथी देश आणि 8 आंतरराष्ट्रीय संघटनांचे 64 प्रतिनिधी उपस्थित होते.

जी 20 पायाभूत सुविधा कार्यगटाने भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत 2023 वर्षासाठीच्या पायाभूत सुविधावर कार्यक्रमात चर्चा केली.

भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित या दोन दिवसीय बैठकीत, अन्य मुद्द्यांसह ‘उद्याच्या शहरांना वित्तपुरवठा : समावेशक, लवचिक आणि शाश्वत’ या प्रमुख संकल्पनेवर चर्चा करण्यात आली. शहरांना आर्थिक विकासाचे केंद्र बनवणे, शहरी पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा, भविष्यासाठी सज्ज शहरी पायाभूत सुविधांची उभारणी, शाश्वत उद्दिष्टे पूर्ण करण्यात शहरांची भूमिका, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ पायाभूत सुविधांसाठी खाजगी वित्तपुरवठा उपलब्ध करण्यासाठी वित्तीय गुंतवणुक वळवणे आणि सामाजिक असंतुलन कमी करणे अशा विविध पैलूंवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

पुण्यातील बैठकीच्या निमित्ताने ‘उद्याच्या शहरांना वित्तपुरवठा’ यावर उच्चस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली, ज्यामध्ये 15 हून अधिक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी शहरांच्या वित्तपुरवठ्याशी संबंधित समस्यांवर चर्चा केली. खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी उद्याच्या शहरांनी त्यांचे नियोजन, निधी पुरवठा आणि वित्तसहाय्य सारख्या प्रमुख प्रशासकीय कार्यांची कशा प्रकारे सांगड घालावी यावर कार्यशाळेत चर्चा झाली. तीन आंतर-संबंधित सत्रांमध्ये विभाजित या कार्यशाळेमध्ये पायाभूत सुविधांवर तसेच उद्याची शहरे उभारण्यासाठी संबंधित तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षमता यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. उद्याच्या शहरांसाठी खाजगी वित्तपुरवठा वाढवण्यासाठी शहरे आणि प्रशासन स्वतःला कसे तयार करू शकतात यावर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

पायाभूत सुविधा कार्यगटाच्या बैठकीदरम्यान, प्रतिनिधींना पुण्याच्या समृद्ध पाककृतींचा आस्वाद घेण्याची तसेच इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी देखील मिळाली. एकूणच, प्रतिनिधींनी केवळ फलदायी बैठकाच घेतल्या नाहीत तर पुण्याचा सांस्कृतिक अनुभव देखील घेतला.

See also  पवारसाहेब काहीही द्या परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद आमदार किती देऊ नका..