बावधन येथे कोथरुड बावधन क्षेञीय कार्यालय अंतर्गत स्वच्छ्ता मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..

0

बावधन :

कोथरुड बावधन क्षेञीय कार्यालय अंतर्गत नव्याने समाविष्ट बावधन बुद्रुक गाव येथे नागरिक व सामाजिक संस्था यांच्या सहभागातून सार्वजनिक ठिकाणी रविवार दिनांक ८/१/२०२३ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती खंडोबा मंदिर परिसरात वसुंधरा अभियान ची शपथ घेऊन संपुर्ण खंडोबा मंदिर परिसर ते पुणे बंगलोर मुंबई सर्विस रस्ता या परिसरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर उपक्रम कोथरुड बावधन क्षेञीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त मा.केदार वझे साहेब,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे साहेब,आरोग्य निरीक्षक हनुमंत चाकणकर यांच्या मार्गदर्शनाने मोकादम राम गायकवाड व आरोग्य कोठीवरील सेवक यांनी केले होते.

यावेळी माजी नगरसेवक किरण दगडेपाटील, दिपक दगडे पाटील (माजी उपसरपंच), सुर्यकांत भुंडे यूवा नेते, राजेंद्र बांदल (पेरिविंकल स्कुल संस्थापक), बबनराव दगडे पाटील (माजी सरपंच), गोरखभाऊ दगडे( कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मार्केट यार्ड) बावधन, उमेश कांबळे, प्रकृती वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक राहुल तापकीर, स्वच्छ संघटना संस्था, साविका संस्था, किया मोटर्सचे प्रतिनिधी, सोनक टोयोटा शोरूमचे प्रतिनिधी, चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूल चे शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थीनी, पेरिविंकल स्कूल चे शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी, कॅल सॉफ्ट कंपनीचे प्रतिनिधी, बावधन बुद्रुक परिसरातील सर्व सोसायटी चेअरमन, नागरिक व स्वच्छता मित्र मोहल्ला कमिटी सदस्य कुणाल घारे आदी मान्यवर वर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि कार्यक्रमाचा शेवट स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला.

See also  लाईटहाऊस ही नागरिकांना स्वत:च्या पायावर उभी करणारी अभिनव योजना : चंद्रकांत पाटील