नागपुर :
नागपूरमध्ये (Nagpur News) सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Assembly Session) आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. शिवसेना ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार असुन मोठा राजकिय संघर्ष पाहायला मिळेल.
दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपुरात येणार आहेत. यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरणार आहे.
संजय राऊत यांनी काल नवी मुंबईतील सभेतून शिंदे-फडणवीस सरकारला तसा सूचक इशारा दिला होता. ‘AU’ प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना घेरल्यानंतर आता ठाकरे गटानेही शिंदे फडणवीस सरकारला उत्तर देण्यासाठी रणनिती आखली आहे. संजय राऊतांनी काल बोलताना नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिल्यामुळे आज नागपुरात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर नागपुरात येणार आहेत, गेल्या आठवड्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता.