चुकीचे पायंडे पाडणाऱ्या मंत्र्यांना अजित पवारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झापले..

0
slider_4552

नागपूर :

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अख्ख्या मंत्रिमंडळालाच झापलं. मंत्र्यांकडून नवे पायंडे पाडले जात असल्याने अजित पवार संतप्त झाले होते.

काही मंत्री शर्टाच्या खिशाला पक्षाची चिन्हं असलेले बिल्ले लावून विधानसभेत आले होते. त्यामुळे अजित पवार भडकले. तुम्ही मंत्री आहात. मंत्र्यांनी असे पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असं अजित पवार म्हणाले.

विधानसभेचं कामकाज सुरू होताच अजित पवार बोलायला उभे राहिले. त्यांनी सर्वात आधी मंत्र्याच्या शर्टाच्या खिशाला लागलेल्या पक्षाच्या चिन्हांचा मुद्दा उपस्थित करून मंत्र्यांना फटकारलं. एकनाथ शिंदे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. मंत्रीही राज्याचे मंत्री असतात. ते एखाद्या पक्षाचे मंत्री नसतात. असं असताना आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचं चिन्हं लावून सभागृहात कोणी येत नाही. पंतप्रधानही भाषण करताना चिन्हं लावून येत नाहीत. त्यामुळे नवीन पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असं अजित पवार म्हणाले.

त्यानंतर अजित पवार यांनी सीमाप्रश्नावरून सरकारला घेरलं. सीमा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. काही गावं कर्नाटकात जाण्याचा ठराव करत आहेत. सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे. बैठकीत जे घडलं ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहे. त्याची माहिती त्यांनी सार्वजनिक करावी, असं ते म्हणाले.

6 डिसेंबरला चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे कर्नाटकाला जाणार होते. पण महापरिनिर्वाण दिनामुळे गेले नाही. नंतर ठरलं कुणीच कोणत्याही राज्यातील नेत्यांना कुठेही जाण्यास बंदी करायची नाही. पण लोकसभेच्या एका खासदाराला कर्नाटकाला जाण्यास मनाई करण्यात आली. स्वत: अमित शाह यांच्यासमोर कुणाला अडवणार नाही असं ठरलेलं असताना जिल्हाधिकारी अशा प्रकारची बंदी कशी आणू शकतो? असा सवाल त्यांनी केला.

कोर्टात निकाल लागायचा तो लागेल. पण अशा प्रकारची दडपशाही खपवून घेता कामा नये. कर्नाटकाच्या कुरापती सुरूच आहेत. त्या रोखल्या पाहिजे, असं अजितदादा म्हणाले. अजितदादांचं भाषण सुरू असतानाच त्यांना मध्येच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रोखलं.

See also  कांजूरच्या `त्या' भूखंडावर केंद्र सरकार आणि बांधकाम व्यवसायिक या दोघांचाही अधिकार नसून राज्य सरकारला त्यावर कारशेड उभारण्याचा पूर्ण अधिकार :

तुमचा मुद्दा कळला आहे. त्याची नोंद घेतली आहे. त्यामुळे पुढचं कामकाज घेऊ, असं अध्यक्षांनी सांगितलं. त्यावर सभागृहात एकच गोंधळ झाला. त्यामुळे अध्यक्षांना उभं राहून सदस्यांना शांत करावं लागलं.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1604749177006698496?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1604749177006698496%7Ctwgr%5Ef85b0fcc0cb8d5109636ecf5564b688998b7310e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F