‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल..

0
slider_4552

मुंबई :

‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केलाय.

सर्वच क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. साहित्य क्षेत्रातही सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. सरकारने अशी ढवळाढवळ करू नये, असं अजित पवार(Ajit Pawar) म्हणालेत.

कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केला. या पुरस्काराला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला होता. पण नंतर राज्य सरकारनं तो पुरस्कार अचानकपणे रद्द केला.त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. आज अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत निषेध केलाय.

‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकासाठी जाहीर झालेला पुरस्कार रद्द करून सरकार अघोषित आणीबाणी तयार करत आहे, असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

See also  गर्भवती वाघिणीस गुहेत कोंडून जिवंत जाळण्यात आल्याची भयानक घटना