मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा अजब कारनामा एकाच षटकात मारले जागतिक विक्रमी सात षटकार !

0
slider_4552

मुंबई :

विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या एका खेळाडूनं तब्बल 7 सिक्सर्स ठोकण्याचा पराक्रम गाजवला आणि रेकॉर्ड मोडीत काढलंय. बॉलरनं टाकलेल्या एका नो बॉलचा त्यानं फायदा उठवत 7 बॉलमध्ये 7 सिक्स फटकावून एक नवा इतिहास रचला.

महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) या सामन्यात तब्बल द्विशतकी खेळी केली. पण 49 व्या ओवरमध्ये त्यानं केलेला कारनामा जागतिक रेकॉर्ड बनला.

यंदाच्या विजय हजारे करंडकातला ऋतुराजचा (Ruturaj Gaikwad) हा तिसराच सामना होता. या तीन मॅचमध्ये त्यानं दोन शतकांसह तब्बल 384 धावा फटकावल्या आहेत.

पहिल्याच मॅचमध्ये त्यानं रेल्वेविरुद्ध 124 धावांची नाबाद खेळी केली होती. तर आज उत्तर प्रदेशविरुद्ध क्वार्टर फायनल सामन्यात 220 धावा फटकावल्या.

ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राच्या इनिंगमध्ये 49 व्या षटकात 7 षटकार मारले. एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार ठोकणारा ऋतुराज गायकवाड क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज आहे. यूपीचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंहच्या गोलंदाजीवर ऋतुराजने ही कामगिरी केली.

महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश ही लढत अटीतटीची होईल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने संपूर्ण लक्ष आपल्याकडे वळवून घेतले. त्याने नाबाद द्विशतकी खेळी केली. सोबतच एकाच षटकात तब्बल सात षटकार ठोकण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावे केला. त्याच्या योगदानामुळे महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेशसमोर 331 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या उत्तर प्रदेशचे युवा अष्टपैलू राजवर्धन हंगारगेकर याने पाच बळी घेत कंबरडे मोडले. परिणामी महाराष्ट्राने 58 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.

See also  पुरुष राष्ट्रीयहॉकी मध्ये यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू उपांत्यपूर्व फेरीत