सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेत भारतीय ज्युनिअर हॉकी संघाने मिळविले विजेतेपद

0
slider_4552

मलेशिया :

भारतीय ज्युनिअर हॉकी संघाने मलेशियात सुरु असलेल्या सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेत धडाकेबाज खेळ करत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर पेनल्टी शूटआऊटवर ५-४ ने मात केली. भारतीय हॉकी संघाचं हे तिसरं विजेतेपद ठरलं.

निर्धारित वेळेत सामना १-१ अशा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआऊटमध्ये भारताने बाजी मारली.

दोन्ही संघांमध्ये झालेला शूटआऊटही चांगलाच रंगला. शूटआऊटमध्ये स्कोअरलाईन ३-३ अशी राहिल्यानंतर Sudden Death मध्ये सामन्याचा निकाल लावण्यात आला. ज्यात भारताने कांगारुंवर सरशी मिळवली. उत्तम सिंगने भारताकडून शूटआऊट आणि सडन डेथ मध्ये गोल झळकावले.

भारताकडून सुदीपने १३ व्या मिनीटाला पहिला गोल करत आपल्या संघाला खातं उघडून दिलं. मध्यांतराला दोन मिनीटं बाकी असताना ऑस्ट्रेलियाच्या जॅक होलाडने गोल करुन कांगारुंना १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.

भारतीय हॉकी संघाने याआधी २०१३ आणि २०१४ या दोन वर्षी सुलतान जोहर कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. याव्यतिरीक्त २०१२, २०१५, २०१८, २०१९ या हंगामात भारतीय संघ उप-विजेता राहिला होता.

See also  इंग्लंड संघाचा डेनमार्कला २-१ ने पराभूत करत ५५ वर्षांनी युरो चषक अंतिम सामन्यात प्रवेश