लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित “सूरसंध्या” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

0

बाणेर :

दिवाळी निमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने “सूरसंध्या” ह्या सुरेल मैफिलीचा कार्यक्रम रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, बंटारा भवन बाणेर, पुणे या ठिकाणी आयोजित केला होता. तसेच यावेळी बाणेर, बालेवाडी, औंध, सुस, महाळुंगे येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाज उपयोगी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार देण्यात आला.

यावेळी बोलताना युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, दिवाळीचे निमित्त साधून गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील परिसरातील नागरिकांना संगीतमय मेजवानी “सूरसंध्या” या विशेष कार्यक्रमाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील वर्षी खुल्या मैदानावरती भव्य स्वरूपात हा कार्यक्रम घेणार आहोत. कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून मनाला समाधान लाभते. तसेच यावर्षीच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या परिसरामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने आपण त्यांचा सन्मान करत आहोत. असाच प्रतिसाद आम्ही राबविलेल्या सामाजिक उपक्रमांना आपण सतत देत राहाल हि अपेक्षा व्यक्त करत आहे.

भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, नागरिकांची गरज ओळखून त्याची पूर्तता करत लहू बालवडकर यांनी आपले वेगळेपण जपलेले आहे. त्यांचे उपक्रम समाजाला उपयोगी ठरतात. त्यांच्यासारखा सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता आमच्या पक्षात आहे हि समाधान कारक बाब आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी युवा नेते लहू बालवडकर यांचे कौतुक करताना म्हटले की, समाजाशी वेगवेगळ्या उपक्रमातून कशा पद्धतीने जोडले जावे याचे उत्तम उदाहरण लहू बालवडकर यांच्या कार्यक्रमातून पाहायला मिळते.

“सूरसंध्या” ह्या सुरेल मैफिलीचा कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि गायिका आर्या आंबेकर सुंदर मधुर गीतांचा आस्वाद प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात घेतला. तसेच अभिनेता, निवेदक संकर्षण कऱ्हाडे उत्कृष्ट निवेदन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संघटन महामंत्री महाराष्ट्र रवी भुसारी, पुण्याचे भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे,भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्वेता शालिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या वेळी भाजपा कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, मा. नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, मा. नगरसेवक अमोल बालवडकर, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, मा. नगरसेविका स्वप्नाली सायकर, पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, दिलीप परब, प्रल्हाद सायकर, मा. महापौर दत्ता गायकवाड, उमा गाडगीळ, राहुल कोकाटे, नितीन रणवरे, सचिन दळवी, शुभम बालवडकर, शिवम सुतार, अर्जन शिंदे, अर्जुन ताम्हाणे, लक्ष्मण सायकर, बबन चाकणकर, अस्मिता करंदीकर, काळूराम गायकवाड, शरद भोते, राखी श्रीवास्तव आणि भारतीय जनता पक्षाचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी, नेते, मान्यवर उपस्थित होते.

See also  वात्सल्य फाऊंडेशनच्या वतीनं वंचित कुटुंबातील मुलींना ड्रेस मटेरियल स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर यांच्या पुढाकाराने वाटप...!