मनुष्यवस्तीत सापडलेल्या गवाला अखेर आपले प्राण गमवावे लागले….. 

0

पुणे : कोथरूड प्रतिनिधी :-

कोथरूड भागात काल दिसलेल्या गवाला अखेर आपले प्राण गमवावे लागले. मनुष्यवस्तीत चुकलेला गवाला त्याची शिक्षा प्राण गमावून मिळाली ही खूप शोकांतिका आहे. अनेक प्राणी प्रेमी नागरिकांनी ही घटना निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कोथरूड भागातील महात्मा सोसायटीमधील सकाळी रानगवा दिसल्याने एकच खळबळ उडाली. गव्याला पकडण्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.सकाळी अकराच्या सुमारास वन अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते. तोपर्यंत गवा उजवी भुसारी कॉलनीमधील एका सोसायटीमधील पार्किंगमध्ये शिरला होता.

लोकवस्तीमध्ये शिरल्याने लोकांच्या आवाजाने भांबावलेल्या गवाला सैरवैर पळताना काही ठिकाणी धडक दिल्याने गव्याच्या तोंडाला काही प्रमाणात दुखापत झाली होती. वन अधिकारी या गव्या ला पकडण्यासाठी प्रयत्न करत असतानाच तो पौड रोड वरील मुख्य रस्त्यावर पोहचला.त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. त्याचबरोबर तो गवाही नागरिकांना भयभीत झाला होता.

वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचायांनी रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान दोरीच्या मदतीने पकडण्याचे प्रयत्न केले. पण गवा ताब्यात येत नव्हता म्हणून गव्याला इंजेक्शन देण्यात आले. तरी देखील वन कर्मचायाच्या अधिकायांना गव्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं नव्हते. गवा अधिकायांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची दाद देत नव्हता. त्यामुळे जाळीच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आलं होतं. परंतु हे यश गव्याला पकडण्यात आले पण वाचवण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्यांच्या नंतर लक्षात आले.

रेस्क्यू ऑपरेशन करत असताना दुर्देवी रित्या गव्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. एनडीएच्या जंगलातून हा गवा वाट चुकून आला असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

See also  पीएमपीएमएल ची ओला - उबर कॅब कंपन्याना टक्कर